Thursday 10 April 2014

रक्तदान शिबीर - २०१४

|| हरी ॐ ||


|| ॐ मन:सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः ||

रक्तदान शिबीर - २०१४

मानवाची निर्मिती ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृति. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करीत आपले जीवन निरोगी व सुखकर  करण्याचा प्रयास चालवला आहे.असे असूनही मानवाला आजतोवर रक्ताला पर्याय शोधता आला नाही.एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजू मानवाला वाचवते.

मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. ही बाब लक्षात घेवुन सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन, सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र , कोल्हापूर यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.याहीवर्षी रविवार दिनांक 27 एप्रिल 2014 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदानाचे अध्यात्मिक महत्व आपल्याला सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनीं अगदी सहजतेने समजावले आहे.बापू कोणताही उपक्रम राबवतात त्यामागे आपल्या श्रद्धावान मित्रांच्या उन्नतिसाठी निश्चित असा एक हेतु असतो. रक्तदान केल्याने य़ज्ञेन दानेन तपसा या तिनिही गोष्टी बापू आपल्याकडून करवून घेतात.

य़ज्ञ:- यज्ञ म्हणजे काय ? तर समर्पणाच्या भावनेने परमेश्वरास स्मरुण केलेले पवित्र कार्य.
आपण ज्यावेळी रक्तदान करायला जातो त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या मनात हीच भावना असते म्हणजेच हा एक प्रकारचा यज्ञच बापू आपल्याकडून करुन घेतात.


दानेन:- म्हणजेच दान करणे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता ज्यावेळी एखादी गोष्ट आपण दुसऱ्यास देतो.........का ? कारण ते माझ्या सदगुरुला आवडते .
म्हणून तर त्या त्यागाला दान असे म्हणतो आणि असे सत्पात्री दान रक्तदानातुन बापू आपल्याकडून करवून घेतो.
माझ्या सदगुरुला आवडनारया नऊ थेंबांपैकी, आवड़णारया रक्ताचे थेंब मी त्याच्यावरच्या प्रेमापोटी माझ्या गरजू आप्ताला देत आहे.
कितीही पैसे मोजले तरी एखादी गोष्ट पर्यायाने मिळू शकेल पण वेळप्रसंगी रक्तच रक्ताच्या कामी येते,त्यामुळे रक्तदानाला मोल नाही.
हे अमूल्य दान आहे म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटलेले आहे.

तपसा:- म्हणजेच तप करणे. कलियुगात तप करणे म्हणजे कोणत्याही जंगलात जावून किंवा गुहेत बसून आसन लावणे नव्हे तर तप म्हणजे दिनदुबळयांची सेवा करणे.
आणि हीच सेवा बापू रक्तदानातुन आपल्याकडून करवून घेतात.या मागेही बापुंचा हेतु हाच असतो की माझ्या बाळांची प्रगति होवून या समाजाची उन्नति व्हावी, कारण तप केल्याने आम्हाला काय मिळते?...

1) तपश्चर्येचा जेवढा साठा वाढत जातो,तितके पवित्र व निर्मळ स्थान मनुष्याला प्राप्त होते.
2) तपश्चर्येने चिंतन शक्तिमान व रसमय होते.
3) तपश्चर्येने असाध्य ते साध्य होत असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या अनंत अडचणी आहेत ज्या आपणास असाध्य वाटतात त्या साध्य करण्यासाठी रक्तादानासारख्या तपाची आवश्यकता आहे.

आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की मला जो आनंद बापूंमुळे मिळत आहे तोच आनंद इतरानाही मिळो, मग यासाठी रक्तदान ही चालून आलेली संधि आहे.
आपण आपल्या शेजारी , नातलग, मित्रमंडळी याना आपल्या संस्थेच्या रक्तदान शिबिरासंबधी सांगितले पाहिजे.

मग त्यांचा प्रश्न आला की कोण हे बापु ?
तर मग त्या ठिकाणी आपल्याला गुणसंकीर्तन करण्याची संधि मिळूण आपल्या बापुंची इत्यंभुत माहिती देता येवू शकते व त्यांना बापुंपर्यन्त पोहचता येवू शकते. आणि तो एकदा बापुंचा झाला की बापुच त्याचा कायमचा होतो व त्याच्या जीवनात आनंदच आनंद, हे सूत्र तर आपल्या प्रत्येक बापू भक्ताला माहितच आहे.

जर मी एकटा रक्तादानासाठी जाणार असेन तर गुणसंकिर्तानाने कमित कमी पाच जनांना घेवुनच येईन.
मला फ़क्त श्रद्धेने पहिले पावुल उचलायचे आहे बाकि सर्व बापुच सबुरिने हळुहळु करून घेणारच  आहे.


प्रयत्न करने माझे काम I यशदाता मंगल धाम ||

अंती तोचि देइल विश्राम I चिंतेचा उपशम होइल ||

यावर्षी रविवार दिनांक 27 एप्रिल 2014 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

स्थळ:- प्रायव्हेट हायस्कुल , केशवराव भोसले नाट्यगृहासमोर , खासबाग , मंगळवार पेठ, कोल्हापूर . 

वेळ:- सकाळी 9 ते दुपारी २ वाजेपर्यंत.

Saturday 14 December 2013

!! श्रीवर्धमान व्रताधिराज !!


!! श्रीवर्धमान  व्रताधिराज !!


१.) व्रतकाल  व पठण 
-मार्गशीर्ष  महिन्याच्या पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करावा. 
-मार्गशीर्ष पौर्णीमा हा पहिला दिवस धरून एकंदर तीस दिवस ह्या व्रताचा काळ आहे.-बरोबर तीसाव्या दिवशी व्रताचे उद्यापन  करावे. ( मग त्या दिवशी कुठलीही तीथी असो.)श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथातील कुठलेही एक पान स्वेच्छेने निवडावे ह्यास "व्रतपुष्प" असे म्हणतात . -मार्गशीर्ष पौर्णीमेस ह्या व्रतपुष्पाचे पठण सुरु करावे.
-मार्गशीर्ष पौर्णीमेस म्हणजेच पहिल्याच दिवशी एकदा पठण करावे. दूस-या दिवशी दोन
-वेळा, तिस-या दिवशी तीन वेळा, चौथ्या दिवशी चार वेळा असे दिवसागणिक एक-एक
-पठण वाढवत न्यावे. तीसाव्या दिवशी तीस वेळा  व्रतपुष्पाचे पठण करावे.
-व्रतपुष्पाचे पठण कोणत्याही वेळेस करावे. परंतू  शक्यतो सलगपणे पठण करावे ( उदा :-दहाव्या दिवशी किंवा  जो दिवस असेल त्या दिवसाच्या संख्येइतके पठण एकाच वेळी सलगपणे करावे.)
-काही अत्यावश्यक कारणामुळे व्रतपुष्पाचे पठण करीत असताना मध्येच उठावे लागले  तरपरत पठणास बसताना, " जय हरी हरेश्वर जय महामाहेश्वर. " असे म्हणून पठण पुढे  चालू करावे.                                                                                                          -पठण परमात्म्याच्या  मूर्ती वा प्रतिमेसमोर (बापूंचा फोटो ) करावे.                            -जमिनीवर अथवा बैठकीच्या साधनावर ( खुर्ची  इत्यादी ) बसताना चटई, सोवळे,         कांबळे,रेशीम वस्त्र किंवा साधे सुताचे कापड ' आसन ' म्हणून वापरण्यास हरकत           नाही.
-परंतु निव्वळ जमिनीवर बसून पठण केल्यास अधिक चांगले.
-प्रत्येकाने आपल्यास आवडणा-या परमात्म्याच्या स्वरूपाची प्रतिमा व्रतासाठी'आराध्य ' म्हणून  पठणाच्या वेळेस आपल्या समोर एका पाटावर किंवा तबकात ठेवावी. नंतर पठण  झाल्यावर मूळ  स्थानी ठेवण्यास हरकत नाही. अशी प्रतिमा घरातील देवघरात व भिंतीवर  असल्यास तिच्याकडे पाहून  पठण करण्यास सहज सोपे जात असेल तर ती खाली  काढण्याची आवश्यकता नाही.  -प्रतिमेस वा मूर्तीस सुंदर हार घातलेला असावा किंवा कमीत कमी प्राप्त फुले वहावीत प्रतिमेसमोर निरंजन इत्यादी दीप प्रकार तसेच सुगंधी उदबत्ती असल्यास अधिकच सुंदर.-एका वेळेस अनेक मंडळी ज्यांचे व्रतपुष्प एकच आहे ( सारखे). एकत्र येवून पठण करू शकतात. स्वतःच्या किंवा इतरांच्या घरी. तसेच या सगळ्यांनी दररोज तीसही दिवस एकत्रच येवून पठण केले पाहिजे असे नाही. एखादा दिवस न आल्यास स्वतःच्या घरी पठण करावे. -पठण सुरु करताना व पठणाच्या शेवटी कमीत कमी प्रत्येकी एक वेळा अनिरुद्ध गायत्री मंत्र  म्हणावा-व्रतकाळात स्त्रीयांचा मासीक धर्म, तसेच इतर कुठल्याही प्रकारचे असौच आड येत नाहीत.( पठण सुरूच ठेवावे )
-व्रतकाळात बाहेर गावी जाणे झाल्यास परमात्म्याची छोटी प्रतिमा घेवून कुठेही  व्रतपठण करण्यास हरकत नाही.
-सर्वच्या सर्व नऊ अंगे पाळल्यास अत्यंत श्रेयस्कर परंतू न जमल्यास व्रतकाळात व      पठण तसेच उदयापनम ही दोन आवश्यक अंगे व उरलेल्या सात अंगापैकी कुठलीही       तीन अंगे पाळणे आवश्यकच आहे.                                                                        -त्या त्या दिवसाचे पठण झाल्यानंतर साष्टांग दंडवत किंवा लोटांगण घालावे.               -व्रताधीराजाचे एकूण नऊ अंग आहेत. त्यापैकी व्रतकाळात ( तीस दिवस ) पठण             (व्रतपुष्प) आणि शेवटचे अंग म्हणजे उद्यापनम  ही करावेच लागतील.
-व्रतकाळ सोडून इतर वेळेस दरवाजास बारा संख्येपेक्षा कमी चिन्हांचे त्रिपुरारी त्रिविक्रम


 २.) वर्ज्य प्रकरण ( अंग दुसरे ) :
-ह्या व्रताच्या काळात सकाळचा नाष्टा अल्पोप आहार तसेच दुपारच्या भोजनात मांसाहाराचे सेवन करू नये. रात्रीच्या भोजनात मांसाहार करण्यास हरकत नाही.

-ह्या संपूर्ण व्रतकाळात कडधान्याचे सेवन अजिबात करू नये. ( तूर, चणा, मटकी, हिरवे-
       काळे-पांढरे वाटणे, राजमा, चवळी, मसूर, वाल, पावटे ). उडीदाचा वापर जरूर करावा व मूग 
वापरण्यास हरकत नाही.

 ३.) तिलस्नानम ( अंग तीसरे ) :
-ह्या व्रतकाळात स्नानाआदी हलक्या हाताने शरीरास तीळाचे तेल लावावे. व नंतर शक्यतो
कोमट वा गरम पाण्याने  स्वच्छ स्नान करावे. कमीत कमी दोन्ही हातास कोपरापासून
खाली व दोन्ही पायास गुडघ्यापासून खाली तीळाचे तेल स्नानाआधी जरूर लावावे. 

-डोक्यास तीळाचे तेल लावण्याची आवशक्यता नाही. 

-तिलस्नानाने भौतिक, प्राणमय व मनोमय अशा तीनही देहांस शुभ स्पंदने स्वीकारणे सोपे
          होते.  
       
४.) त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम  ( अंग चौथे ) :
 -व्रताच्या प्रथम दिवशी घराच्या दरवाजास कमीत कमी बारा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हांचे
 तोरण बांधावे. 

 -ही चिन्हे तांबे, पंचधातू, चांदी किंवा सोन्यावरच आलेखिलेली असावीत. 

 ५.) त्रिदोष धूपशिखा ( अंग पाचवे ) :
-व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने स्नानानंतर ही धूपशिखा लावावी, तसेच

-पठणाची वेळ वेगळी असल्यास त्यावेळीही जरूर लावावी. 

-ही त्रिविध दोषांचा नाश करते. ( कायिक,वाचिक व मानसिक )
 ह्या धूपशिखेच्या प्रभावामुळे व्रत सफल, संपूर्ण होण्यास सहाय्य होते. 

६.) त्रिपुरारी त्रिविक्रम भोग  ( अंग सहावे ) :
-व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने परमात्म्यास दहीसाख्रेचा व संध्याकाळी
 दूधसाखरेचा नैवैद्य अर्पण करावा. 

-मात्र त्या दिवशीचा नैवैद्य त्याच दिवशी प्रसाद म्हणून, व्रतधारकाने स्वतः ग्रहण करावा व
 इतरांस द्यावा. 

७.) इच्छा दान  ( अंग सातवे ) :
-व्रतकाळात व्रतधारकाने स्वेच्छेने भगवंतचरणी दक्षिणा अर्पण करावी, तसेच  गरजूस सहाय्य करावे. 

-ह्या व्रतकाळात केलेले दान दशगुणा फल देते. 

८.) पुरुषार्थ दर्शन ( अंग आठवे ) :
-व्रतकाळात प्रत्येक व्रतधारकाने कमीतकमी ९ वेळा परमात्मधामास पवित्र दर्शनासाठी
जावे. 

-ज्या व्यक्तीस शारिरीक करणामुळे घराबाहेर पडणे जमणार नाही अशा व्यक्तींना त्या ऐवजी
 शेवटच्या दिवशी ९ वेळा पठण अधिक करवे. 

९.) उद्यउद्यापन   ( अंग नववे ) :
-व्रताच्या तीसाव्या म्हणजेच सांगतेच्या दिवशी पठण पूर्ण झाल्यानंतर परमात्म्याच्या प्रतिमेस अथवा मूर्तीस सुगंधित पुष्पांचे ९ हार अर्पण करावेत.

-त्यानंतर एका तबकात नऊ दीप ठेऊन ते प्रज्वलित करावेत व आरती ओवाळून        'श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष' प्राथना म्हणावी. 


''श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष'' प्रार्थना

 नमो देवदेवेश परात्पर दत्तगुरो !
अष्टबीजस्मरणं सर्वथा रामदायकम !!
श्रीः शुद्धत्वं वैराग्यं व्यापकत्वं  द्रां दत्तात्रेयाय नमः!
कालातीतव्यं वात्सल्यं  द्रां दत्तात्रेयाय नमः!
सर्वज्ञत्वं कारुण्यं  द्रां दत्तात्रेयाय नमः !
 नमो महामाहेश्वर प्रणवरूप परमात्मने !
नवांकुरस्मरणं सर्वथा शुभमंगलम !!

श्रीः भर्गः जन्मकर्मनिवारकम - वासुदेवाय नमः !
श्रीः ओजः सर्व आरोग्यदायकम - वासुदेवाय परमपदाय नमः !
श्रीः शान्तिः सर्वत्रसुखकारिणी  परमपदाय नमः !
श्रीः तृप्तिः सदैवयशदायानी  परमपदाय संकर्षणाय नमः !
श्रीः श्रद्धा सर्वसामर्थ्यमूला  संकर्षणाय नमः !
श्रीः धैर्यः  सर्वसामर्थ्यवर्धिष्णू  संकर्षणाय प्रदयुम्नाय नमः !
श्रीः दया जीवशुद्धमतिः  संकर्षणाय अनिरुद्धाय नमः !
श्रीः अनुकम्पा साक्षात वात्सल्यमूर्तिः  अनिरुद्धाय नमः !
श्रीः क्षमा भवतारिणी ॐ अनिरुद्धाय आल्हादिनीपतये नमः !

         
-त्यानंतर नऊ लोटांगणे घालावीत . 

        -ह्यालाच श्रीवर्धमान व्रताधीराजाचे ''उद्यापनम'' असे म्हणतात. 

          -उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ''त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम तोरण'' सन्मानपूर्वक
काढून पवित्र जागी ठेवावे. 
मंगलम तोरण लावण्यास हरकत नाही व असे इतर वेळचे तोरण कापडाचेही असण्यास
हरकत नाही. 

-श्रीवर्धमान व्रताधीराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ-अंकुर-ऐश्वर्यांची प्राप्ती करून घेण्याचा महामार्ग. ह्या व्रतास फक्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेसच आरंभ करता येतो.

-मार्गशीर्षपौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती अशा पवित्रदिनी सुरु होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो व भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात. 

-काही अत्यावश्यक कारणांमुळे मधे खंड पडल्यास तितक्या दिवसांच्या दुप्पट दिवस व्रतात वाढवावेत. 

-परंतु सहा दिवसांपेक्षा ( एकत्रित व अलग अलग ) आर्थिक दिवसांचा खंड पडल्यास व्रत दुपटीने दिवस वाढवूनसुद्धा  पूर्ण होत नाही. अशा वेळेस दुःख न मानता व्रत स्थगित करावे व पुढील वर्षी व्रत जरूर करावे. 

-नाईलाजामुळे व्रत अपूर्ण राहिल्यास कुठ्लेही पाप अथवा दोष लागत नाही. 

-''नरक''कुठे वर आकाशात किवा पाताळात नसतो तर तो जीवनातच प्रारब्धामुळे उत्पन्न होत असतो, श्रीवर्धमान व्रताधीराजाचे पालन करण्याने मनुष्याच्या जीवनात ''नरकयातना'' कधीच येत नाहीत.

-श्रीवर्धमान व्रतीधीराजच्या पालनात स्थूल, सूक्ष्म व तरल ह्या तीनही स्तरांवर भगवंतकृपेने आपोआपच प्रत्येक गोष्ट संपन्न होते.

 " मी  अंबज्ञ  आहे , आम्ही  अंबज्ञ  आहोत "